Poonam Pandey Death News: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचं (Poonam Pandey Death) निधन झाल्याचं वृत्त आहे. पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याबाबतची पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलंय की, "आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली" पूनम पांडेला सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) अर्थात गर्भाशयाचा कर्करोग होता असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. मात्र कालच जाहीर झालेल्या देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पात गर्भाशयाच्या कर्करोगापासून  बचावासाठी केंद्र सरकारनं (Central Government) मोठा निर्णय घेतला होता. 9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस (Free Vaccine) देण्याची घोषणा केली. त्यामुळे पूनम पांडेंच्या निधनाच्या पोस्टवरुन नेटकऱ्यांमध्ये उलट-सुटल चर्चा सुरू आहेत.


अर्थमंत्र्यांची घोषणा नेमकी काय? 


यंदा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामाचा लेखाजोगा सांगितला. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या विकासाबाबत भरपूर समावेश करण्यात आला आहे. सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) रोखण्यासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीम (Free Vaccination Campaign) सुरू करण्यात येणार आहे. मिशन 'इंद्रधनुष' अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.


'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' लस बनवणार 


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) टाळण्यासाठी Cervavac नावाची लस विकसित करेल, जी HPV च्या चार प्रकारांपासून संरक्षण प्रदान करते - 16, 18, 6 आणि 11. SII चे CEO आदर पूनावाला यांनी आधीच सांगितलं होतं की, या लसीची किंमत 200-400 रुपये प्रति रुपये डोस असेल. सध्या बाजारात गर्भाशय ग्रीवाच्या लसी उपलब्ध आहेत. त्या लसींची किंमत प्रति डोस 2,500 ते 3,300 रुपये आहे.


सिक्कीम सरकारची मोहीम सुरू


सिक्कीम सरकारनं 2016 मध्ये GAVI नावाची लस खरेदी केली आणि ही लस 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना देण्यात आली. आकडेवारी दर्शवतं की, सिक्कीम सरकारच्या आकडेवारीनुसार, या कार्यक्रमांतर्गत 97 टक्के मुलींचं लसीकरण करण्यात आलं. आता ते नियमित लसीकरणाचा भाग म्हणून प्रदान करतात आणि कव्हरेज टक्केवारी सुमारे 88 ते 90 टक्के आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Cervical Cancer Symptoms : महिलांमध्ये आढळणारा सर्वायकल कॅन्सर नेमका कशामुळे होतो? वाचा लक्षणं आणि उपचार