रायपूर : नक्षलविरोधी कारवाईत छत्तीसगड पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. चकमकीत पोलिसांनी 14 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ही चकमक अजूनही सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही चकमक सुकमाच्या गोलापल्ली आणि कोटा भागातील नुलकातुंग गावात सुरु आहे.
पोलिसांनी नक्षलवाद्यांचं साहित्य आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. सुकमाचे पोलीस अधीक्षक अभिषेक मीणा यांनी याबाबत माहिती दिली आणि 14 जणांचा खात्मा करण्यात आल्याचं सांगितलं. सर्च ऑपरेशनदरम्यान पोलिसांना 16 परदेशी शस्त्र मिळाले असून सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत, असं ते म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, 200 पेक्षा नक्षलवादी एका ठिकाणी जमणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफ टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात 14 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
ही चकमक संपण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. चकमक संपल्यानंतर पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल. शहीद सप्ताहामध्ये पोलिसांसाठी हे मोठं यश मानलं जात आहे.
सुकमामध्ये 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलिसांचं मोठं यश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2018 01:34 PM (IST)
सूत्रांच्या माहितीनुसार, ही चकमक सुकमाच्या गोलापल्ली आणि कोटा भागातील नुलकातुंग गावात सुरु आहे. पोलिसांनी नक्षलवाद्यांचं साहित्य आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -