कोलकाता : 33 लाख रुपयांच्या नोटा आणि सात शस्त्रांसह कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स टीमने भाजप नेते मनीष शर्मा यांना अटक केली आहे. शर्मा यांच्यासोबत सहा कोळसा माफियांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मनीष शर्मा यांच्याकडून 33 लाख रुपये जप्त करण्यात आले असून, यात सर्व 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत. यावेळी सात फायर आर्मसोबत 89 राऊंड गोळ्याही जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी मनीष शर्मा यांना राणीगंजमधून 33 लाख रुपयांसोबत अटक करण्यात आली. यात 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा असल्याने प्रकरणाबाबत संशय आणखी वाढला आहे.
2015 च्या विधानसभा निवडणुकीत मनीष शर्मा हे भाजपकडून लढले होते. राणीगंज विधानसभा मतदारसंघात ते भाजपचे उमेदवार होते.
मोठ्या रकमेत जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी कोलकात्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.