मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सात परदेश दौरे केले. यामध्ये 8 देशांचा दौरा केला. मोदींचा पहिला परदेश दौरा भूतानचा होता. त्यानंतर ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार ऑस्ट्रेलिया आणि फीझी या देशांचा समावेश होता, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
पीएमओने दिलेला मोदींच्या चार्टर्ड विमानाचा खर्च
- भूतानः 2,45,27,465 रुपये
- ब्राझीलः 20,35,48,000 रुपये
- नेपाळः भारतीय वायुसेनेचं विमान बोईंग बिझनेस जेटचा वापर करण्यात आला.
- जपानः 13,47,58,000 रुपये
- अमेरिकाः 19,04,60,000 रुपये
- म्यानमार, ऑस्ट्रेलिया आणि फीझीः 22,58,65,000 रुपये