दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला, त्यांच्यावर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र, यानंतर पंतप्रधान कार्यालयानं या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा नेमका आरोप काय?
‘महाराष्ट्र शासनाचे जे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये एक असा मेसेज फिरतो आहे की, पीएमओ ऑफिसमधून एक संदेश आला आहे की, संभाजी भिडे यांना अटक करु नका. मी असं समजतो की, असे मेसेज पाठवणे चुकीचं आहे. कायदा हा सर्वांना समान आहे. ज्यांनी गुन्हा केला असेल त्यांना अटक झाली पाहिजे. संभाजी भिडें यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अजामीनपात्र कलम लावण्यात आले आहेत. तेव्हा त्यांना अटक होणं गरजेचं आहे.’ असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
VIDEO:
संबंधित बातम्या :
भिडे गुरुजी समर्थकाची मुख्यमंत्र्याना जीवे मारण्याची धमकी : प्रकाश आंबेडकर
हिंसा सोडल्यास लोकशाही न मानणाऱ्यांनाही सोबत घेईन : प्रकाश आंबेडकर
भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे