PM To Meet Startsups : देशातील स्टार्टअप इकोसिस्टमला  ( Startup Ecosystem) बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. 15 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंगद्वारे स्टार्टअप्ससोबत संवाद साधणार आहेत. मोदी सरकारने देशातील स्टार्टअपच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यावर काम केले आहे. याचा देशातील स्टार्टअप परिसंस्थेवर उत्तम परिणाम झाला आणि त्यामुळे देशात युनिकॉर्नची आश्चर्यकारक वाढ झाली आहे. याचाच भाग म्हणून शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्टअप्ससोबत संवाद साधणार आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 150 स्टार्टअप्ससोबत संवाद साधणार आहेत. कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग 4.0, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी होतील.  150 हून अधिक स्टार्टअप्सची सहा कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली गेली आहे. प्रत्येक गट त्यांना दिलेल्या संकल्पनेवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण करेल. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश आहे.


कोणते आहेत सहा गट - 
ग्रोइंग फ्रॉम रूट्स
डीएनए विषयक माहिती
स्थानिक ते जागतिक
भविष्यातील तंत्रज्ञान
उत्पादन क्षेत्रात जगज्जेते घडवणे 
शाश्वत विकास   


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, 10 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे "सेलिब्रेटिंग इनोव्हेशन इकोसिस्टम" हा आठवडाभर चालणारा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या 6 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला आहे. स्टार्टअप्सच्या देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या क्षमतेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या शुभारंभात हे प्रतीत झाले. सरकारने स्टार्टअपच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यावर काम केले आहे. याचा देशातील स्टार्टअप परिसंस्थेवर उत्तम परिणाम झाला आणि त्यामुळे देशात युनिकॉर्नची आश्चर्यकारक वाढ झाली आहे.