नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था डिजिटल क्रांतीकडे आणखी एक पाऊल पुढे टाकत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या  डिजिटल व्यवहारासाठी उपयोगी ठरणाऱ्या e-RUPI चा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली असून e-RUPI हे आर्थिक व्यवहारासाठी कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे. 


देशातील कॅशलेस व्यवहारांना गती 
देशातील आर्थिक व्यवहार अधिक कॅशलेस व्हावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्या दृष्टीने केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात अनेक योजना राबवल्या आहेत. कॅशलेस व्यवहारांमुळे इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास अधिक मदत होते. त्या दृष्टीने केंद्र सरकारने आणखी एक पाऊल पुढं टाकलं असून e-RUPI मुळे 'इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर' चा विचार पुढे येईल आणि त्यातून सुशासन निर्माण होईल असं पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलंय. 


 




काय आहे  e-RUPI? 
e-RUPI हे आर्थिक व्यवहारांचे एक कॅशलेस माध्यम आहे. हे एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग आधारित ई-व्हाऊचर व्यवस्था आहे ज्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवला जातो. नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर  e-RUPI या सेवेची सुरुवात केली आहे. त्यासाठी अर्थ विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची मदत घेण्यात आली आहे. 


e-RUPI वापर हा केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी केला जाऊ शकतो. त्यामध्ये आरोग्य विभागाच्या अनेक योजना आहेत, लाभार्थ्यांना अनुदान देण्याच्या योजना आहेत तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारीही याचा वापर करु शकतात. 


महत्वाच्या बातम्या :