नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) बैठकीचे अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. असं करणारे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान असतील असं संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचा हा आठवा कार्यकाळ असून या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक संपूर्ण ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं की, भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासातील एखाद्या राजकीय नेत्याने, पंतप्रधानांने अशा प्रकारचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणे ही पहिलीच गोष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्याला या वर्षी 75 वर्षे होणार असून अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकरणार हा दुग्धशर्करा योग आहे.
संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार, सुरक्षा परिषदेतील स्थायी आणि अस्थायी सदस्य राष्ट्रांना क्रमाने अध्यक्षपद दिले जाते. भारत सध्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिदषेचा अस्थायी सदस्य देश असून या वेळचे अध्यक्षपद भारताच्या पारड्यात पडलं आहे. त्यामुळे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. भारतीय पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीचे अध्यक्षपद सांभाळतील तर देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव श्रृंगला हे न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या बैठकीत उपस्थित असतील.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अशा प्रकारे राजकीय नेतृत्वाने सक्रिय भूमिका घेणं हे सकारात्मक आहे, ते फ्रन्टलाईनवर येऊन त्याने काम करणे यातून एक सकारात्मक संदेश जात असल्याचं संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागाच्या दौर्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या 'या' 26 मागण्या
- Sisters Day 2021: एक हज़ारों में मेरी बहना है! 'सिस्टर्स डे' च्या निमित्ताने माना बहिणीचे आभार
- Friendship Day : 'सलामत रहे दोस्ताना हमारा'; जाणून घ्या का साजरा केला जातोय 'फ्रेंडशिप डे'