नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) संस्थापक सदस्य आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांनी रविवारी 8 नोव्हेंबर रोजी आपल्या वयाची 99 वर्षे पूर्ण करून आयुष्याच्या 100 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर करत लालकृष्ण अडवाणी यांच्या देशसेवेतील अतुलनीय योगदानाची आठवण करून दिली. तसेच अडवाणी यांच्या जीवनप्रवासावर लिहिलेला एक विशेष लेखही त्यांनी प्रसिद्ध केला आहे.
Special Coincidence Diwali : 'दिवाळीच्या दिवशीच 100 व्या वर्षात पदार्पण'
लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज 8 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक आहे. आजच्या दिवशीच दीपावलीचा पावन पर्व असणे हा एक खूप मोठा सुखद संयोग आहे. प्रभू श्रीराम आणि दिव्यांच्या या उत्सवासोबत अडवाणीजींच्या आयुष्याचा हा महत्त्वाचा टप्पा जोडला जाणे या प्रसंगाला अधिक स्मरणीय बनवतो."
या वर्षाला विशेष बनवणाऱ्या इतर घटकांचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, "याच वर्षी आपण जनसंघ स्थापनेची 75 वर्षे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) 100 वर्षे आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती देखील साजरी करत आहोत."
PM Modi Special Blog : फाळणीच्या वेदना ते सोमनाथ-अयोध्या रथयात्रा
लालकृष्ण अडवाणी यांच्यावर लिहिलेल्या लेखात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संघर्षाचा आणि योगदानाचा आढावा घेतला. देशाच्या फाळणीची भयावहता अनुभवल्यानंतर शून्यातून पुन्हा आयुष्याची सुरुवात करत जनसंघ मजबूत करणे आणि भाजपच्या निर्मितीतील अडवाणींचे योगदान मोलाचे आहे. आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि सोमनाथ ते अयोध्या काढलेली ऐतिहासिक 'रथयात्रा' देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. आजचा हा प्रसंग माझ्यासाठी वैयक्तिकरीत्या अत्यंत भावुक करणारा आहे. मला कायम त्यांचे प्रेम, सहवास आणि मार्गदर्शन लाभले, हे मी माझे भाग्य मानतो, असे मोदींनी त्यांच्या लेखात नमूद केलं आहे.
ही बातमी वाचा:
