PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  आजपासून दोन दिवसांच्या गुजरात (Gujarat) दौऱ्यावर जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी (PM Modi) अनेक महत्त्वाच्या योजनांच्या घोषणा तसेच महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी आज अहमदाबादमध्ये साबरमती नदीवरील (Sabarmati River) पादचाऱ्यांसाठी असलेल्या अटल पुलाचे (Atal Bridge) उद्घाटन करणार आहेत.


गुजरात सरकारकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी


पीएम मोदींच्या गुजरात दौऱ्याबाबत गुजरात सरकारने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी संध्याकाळी साबरमती रिव्हरफ्रंटवर आयोजित खादी महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होतील, जिथे ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील, असे सांगण्यात आले आहे.


अटल पुलाचे होणार उद्घाटन 


या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी अहमदाबाद महानगरपालिकेने बांधलेल्या अटल पुलाच्या फूट ओव्हर ब्रिजचेही उद्घाटन करतील. या पुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. एलईडी लाइट्सने सजवलेल्या या पुलाची रचना खूपच आकर्षक आहे.


साबरमती रिव्हरफ्रंटवर बांधला अटल पूल 


हा अटल पूल सुमारे 300 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे. हा पूल साबरमती रिव्हरफ्रंटच्या पश्चिमेकडील फ्लॉवर गार्डन आणि पूर्वेकडील कला आणि संस्कृती केंद्राला जोडतो. याचा उपयोग पादचाऱ्यांना तसेच सायकलस्वारांना नदी ओलांडण्यासाठी करता येईल.


पंतप्रधान मोदी गांधीनगरलाही भेट देणार 


पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सुझुकी कंपनीच्या 40 वर्षांच्या प्रवासानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गांधीनगरमध्ये (Gandhinagar) आयोजित कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय रविवार 28 ऑगस्ट रोजी ते कच्छ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते 'स्मृती वन'सह विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील.


इतर महत्वाच्या बातम्या


Mumbai Traffic Police : चिंतामणी गणपतीच्या आगमनासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग


Kerala High Court : राज्यातील अवैध धार्मिक स्थळे बंद करा, उच्च न्यायालयाचे आदेश; काय म्हटले कोर्टाने..