Mann Ki Baat: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचं (Christmas) औचित्य साधत देशवासियांना 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमामार्फत संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गेल्या आठवड्यात देशवासियांना त्यांच्या कल्पना पाठवण्याचं आवाहन केलं होतं. 


2022 ची शेवटची 'मन की बात' (Mann Ki Baat) या महिन्याच्या 25 तारखेला होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी ट्वीट (PM Modi Tweet) केलं होतं. या कार्यक्रमाबद्दल तुमचे विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यांनी ट्वीटमध्ये पुढे सांगितलं की, मी तुम्हाला नमो अॅप, MyGov वर लिहा आणि तुमचा मेसेज 1800-11-7800 या क्रमांकावर रेकॉर्ड करा. 


11 वाजता 'मन की बात' 


मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ज्या मुद्द्यांवर बोलावं असं तुम्हाला वाटतं, त्या मुद्द्यांसंदर्भात मोदींनी सूचना मागवल्या होत्या. दरम्यान, आता या ट्रोल-फ्री नंबरवर मेसेज रेकॉर्ड केले जाऊ शकत नाहीत, कारण आजपर्यंत मिळालेल्या सूचनांवर पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. मन की बात कार्यक्रम आज 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जाणार आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्कवर, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाईट आणि न्यूजोनियर मोबाईल अॅपवर प्रसारित केला जाईल. 


कोरोना प्रादुर्भावावर बोलणार पंतप्रधान मोदी 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान देशवासियांशी कोरोनाबाबत सावध राहण्यासाठी बोलू शकतात. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी करु शकतात. तसेच, कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिग पाळण्याचंही आवाहन पंतप्रधान मोदी करु शकतात. 


भारत हे जुन्या परंपरांचं माहेरघर : पंतप्रधान मोदी 


यापूर्वी 30 नोव्हेंबर रोजी 'मन की बात'च्या 95व्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "आपला देश जगातील सर्वात जुन्या परंपरांचे घर आहे. त्यामुळे आपल्या परंपरा आणि पारंपारिक ज्ञानाचं जतन करणं, त्याचा प्रचार करणं आणि शक्य तितकं पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे.


भारतीय संगीत केवळ भारतातच नाही तर परदेशातही लोकांना कसं जवळ आणतंय यावर पंतप्रधानांनी भर दिला. संगीतामुळे केवळ शरीरालाच आनंद मिळत नाही, तर मनालाही आनंद मिळतो. संगीत आपल्या समाजालाही जोडतं, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी नागा समुदायाचं उदाहरण दिलं आणि त्यांचा गौरवशाली सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांचंही उदाहरण दिलं. मन की बात दरम्यान, पंतप्रधानांनी गांधीजींच्या 150 व्या जयंती सोहळ्यात बापूंचं आवडतं गाणं गायलेले ग्रीक गायक 'कॉन्स्टँटिनोस कालित्झिस' याबद्दल बोलले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मुख्यमंत्र्यांच्या नातवाला पंतप्रधानांची टाळी! चिमुरड्या रुद्रांश शिंदेला मोदींनी खाऊही दिला अन्...