Mann Ki Baat : साताऱ्याच्या प्रवीण जाधव यांचं ऑलिंपिकसाठी निवडीबद्दल पंतप्रधानांकडून कौतुक

Mann ki Baat : पंतप्रधानांनी मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधत कोरोनाचे दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे असं सांगितलं. त्याचसोबत त्यांनी टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

Continues below advertisement

नवी दिल्ली : टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. त्यामुळे या खेळाडूंना खुल्या मनानं पाठिंबा द्या असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या प्रवीण जाधव या खेळाडूचे ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक केलं. 

Continues below advertisement

'मन की बात' मधून पंतप्रधानांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं. तसेच टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा संघर्ष कठोर आहे असं सांगत त्यांनी ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधांनांनी शुभेच्छा दिल्या.

कोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नये, प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत योगदान द्यावं असं पंतप्रधघान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. 21 जूनपासून भारतात 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण सुरु झालं असून त्या दिवशी कोरोना लसीकरणाचा विक्रम झाला असल्याचं पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले.  

साताऱ्याच्या प्रवीण जाधव या खेळाडूचा उल्लेख
पंतप्रधानानी आपल्या मन की बात या कार्यक्रमात साताऱ्याच्या प्रवीण जाधव या ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधव बद्दल ऐकले  तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा  मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट  आहे."

पंतप्रधान म्हणाले की, "टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण  कळत-नकळत दबाव आणायचा नाही तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे." 

महत्वाच्या बातम्या : 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola