Mission Divyastra : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डीआरडीओच्या शास्रज्ञांच्या नव्या यशस्वी चाचणीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. डीआरडीओने मिशन दिव्यस्त्रची यशस्वी चाचणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी DRDO शास्त्रज्ञांचं मिशन दिव्यस्त्र या नावाने स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची (Agni 5 Nulear Missile) पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. डीआरडीओ (DRDO) म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. डीआरडीओच्या आणखी एका यशस्वी चाचणीचं कौतुक करत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
DRDO चं मिशन दिव्यास्र यशस्वी
पंतप्रधान मोदींनी अधिकृत एक्स मीडिया अकाऊंटवर ट्वीट करत म्हटलं आहे की, "मिशन दिव्यस्त्रासाठी आमच्या DRDO शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी. असं मोदींनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी
मिशन दिव्यस्र अंतर्गत अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे. या क्षेपणास्रामध्ये मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञान आहे. अचूक लक्ष्य भेदण्यासाठी याचा वापर होतो. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं मिशन दिव्यस्त्र यशस्वीरित्या पार पडलं आहे. डीआरडीओकडून मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल (MIRV) ने सुसज्ज स्वदेशी विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी पार पडली आहे.
अग्नी 5 मिसाईल काय आहे?
अग्नी 5 हे भारताचे इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) आहे. याची निर्मिती डीआरडीओने (DRDO) केली आहे. अग्नी 5 ची यशस्वी चाचणी ही भारताच्या लष्करला बळ देणारी तसेच पाकिस्तान आणि चीनची झोप उडवणारी आहे.
स्वदेशीमुळे भारताची ताकद वाढणार
अलिकडच्या काळात भारत स्वदेशी वर अधिक भर देत आहे. स्वदेशी बनावटीची अनेक क्षेपणास्र भारतीय लष्करात (Indian Army) तैनात आहेत. डीआरडीओ म्हणजे भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून स्वदेशी बनावटीची शस्रास्रे विकसित करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. भारतीय बनावटीची ही शस्रास्रे भविष्यात शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी मदत करतील.
देशाची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल
भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र क्षमतांना पुढे नेण्यासाठी मिशन दिव्यास्त्राचे महत्त्व अधोरेखित करून DRDO शास्त्रज्ञांनी दाखवलेल्या तांत्रिक पराक्रमाबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिमान व्यक्त केला. MIRV तंत्रज्ञानासह अग्नि-5 क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी उड्डाण देशाच्या संरक्षण सज्जता आणि सामरिक क्षमतांना बळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.