The Sydney Dialogue: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 'द सिडनी डायलॉग' मध्ये भारताच्या प्रौद्योगिकी विकास आणि क्रांती विषयावर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भारताच्या डिजिटल क्रांतीची मुळं ही लोकशाहीत रुजलेली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, भारतात डिजिटल क्रांतीमुळं लोकांचं आयुष्य बदललं आहे. मला या  सिडनी डायलॉगमध्ये संबोधित करण्याची संधी दिलीत ही भारतासाठी सन्मानाची गोष्ट आहे.


डिजिटल युगामुळं आपल्या भवतालात खूप काही बदलतंय


पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की,  मला या  सिडनी डायलॉगमध्ये संबोधित करण्याची संधी दिलीत ही भारतासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी या गोष्टीला हिंद-प्रशांत क्षेत्र आणि उभारी घेत असलेल्या डिजिटल दुनियेत भारताच्या केंद्रीय भूमिकेच्या मान्यतेच्या रुपात पाहतो. डिजिटल युगामुळं आपल्या भवतालात खूप काही बदलत आहे. यात राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची पुन्हा नवी व्याख्या केली आहे.  


भारतासाठी लोकशाही भारतीय जीवनाचा एक भाग


अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या कार्यक्रमात मोदी म्हणाले की,  भारतासाठी लोकशाही म्हणजे केवळ एक प्रणाली नाही तर लोकशाही आपल्या स्वभावात मुरलेली असून ती भारतीय जीवनाचा एक भाग आहे. येत्या काळात आपल्याला आपल्या देशाला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे आणि असामान्य उद्दिष्ट्ये गाठायची आहेत. आणि हे लक्ष्य फक्त ‘सबका प्रयास’च्या माध्यमातूनच गाठता येईल. भारताच्या लोकशाही व्यवस्थेत, संघराज्य प्रणालीमध्ये जेव्हा आपण ‘सबका प्रयास’बाबत बोलतो तेव्हा सर्व राज्यांची भूमिका हा या ‘सबका प्रयास’ उपक्रमाचा भक्कम पाया आहे हे लक्षात घ्यायला हवे. एका दशकाहून अधिक काळ रेंगाळलेल्या ईशान्येकडील राज्यांच्या समस्यांवरील उपाययोजना असो किंवा अनेक दशके अडकून पडलेले सर्व विकासविषयक प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न असो, देशातील अशी अनेक कामे गेल्या काही वर्षांत पूर्ण करण्यात आली आणि त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न कामी आले असे पंतप्रधानांनी सांगितले. कोरोना महामारीशी दिलेला लढा हे देखील ‘सबका प्रयास’ च्या यशाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.