नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात घडलेल्या घटनेबद्दल मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई (CJI BR Gavai) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. एका वकिलाने सुनावणीदरम्यान (Supreme Court Hearing) कोर्टात गोंधळ घातला आणि मुख्य न्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न (Shoe Attack Attempt) केला. या घटनेनंतर पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Continues below advertisement

पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जे घडलं, त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिक नाराज आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना (Condemnable Acts) जागा नाही. ही घटना अतिशय खेदजनक आहे.”

मुख्य न्यायाधीशांच्या धैर्याचे कौतुक (PM Modi Praised CJI Bhushan Gavai)

पंतप्रधानांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शांततेचे आणि संयमाचे कौतुक केले. अशा परिस्थितीत गवई यांनी दाखवलेले संयम आणि धैर्य न्यायव्यवस्थेच्या मूल्यांबद्दलची त्यांची निष्ठा दाखवते. हे आपल्या संविधानाच्या भावनेला अधिक बळकट करणारे आहे असं पंतप्रधान म्हणाले.

Continues below advertisement

सुप्रीम कोर्टात वकिलाचा गोंधळ (Supreme Court Chaos)

ही घटना सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान घडली. वकील राकेश किशोर (Advocate Rakesh Kishore) याने कोर्टात गोंधळ घातला आणि 'सनातनचा अपमान सहन करणार नाही' अशी घोषणा दिली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या वकिलाला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी डीसीपी कार्यालयात (DCP Office) नेले.

CJI गवईंची शांत प्रतिक्रिया (CJI Gavai’s Response)

घटनेनंतर CJI गवई म्हणाले, “अशा कृतींनी आम्ही प्रभावित होत नाही. न्यायालयाचे कामकाज सुरूच राहील". या गोंधळानंतरही त्यांनी सुनावणी थांबवली नाही आणि कोर्टातील शिस्त कायम ठेवली.

वकिलांच्या संघटनेचा निषेध (Advocates Association Condemnation)

या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन (Supreme Court Advocates-on-Record Association) ने तीव्र निषेध नोंदवला. संघटनेने म्हटलं, “एका वकिलाच्या वर्तनामुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा आणि मुख्य न्यायाधीशांच्या पदाचा अपमान झाला आहे.”

ही बातमी वाचा;