आर्थिक घोटाळ्यांच्या बाबतीत सरकारचं धोरण झिरो टॉलरन्सचं असल्याचं मोदींनी सांगितलं. सरकार आर्थिक विषयाशी संबंधित अनियमिततेविरोधात कठोर कारवाई करत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली
'ज्या भिन्न वित्तीय संस्थांवर नियमनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांनी पूर्ण निष्ठेने आपलं कर्तव्य बजावायला हवं. विशेषतः ज्यांच्यावर देखरेख आणि मॉनिटरिंगचं काम सुपूर्द करण्यात आलं आहे, त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी' असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पंजाब नॅशनल बँक किंवा नीरव मोदी यांचा थेट उल्लेख केलेला नाही. घोटाळ्यावर मोदींनी मौन बाळगल्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल केला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही प्रश्न उपस्थित केले होते.