पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 'मै भी चौकीदार हूँ' ही लाईन वापरत आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास, अस्वच्छता, सामाजिक प्रश्न या विरोधात लढणारा प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं मोदींनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. त्यानंतर आज मोदींसह इतर भाजप नेत्यांनी ट्विटरवर त्यांच्या नावापुढे चौकीदार हा शब्द लावत मोहीम उघडली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचं नाव बदललं आहे.