लाल किल्ल्यावरुन मोदींनी आतापर्यंत चार भाषणं केली. 2017 मध्ये 55 मिनिटांच्या भाषणात मोदींनी विविध विषयांवर भाष्य केलं. यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्या स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट 1947 रोजी 72 मिनिटे भाषण केलं होतं.
पंतप्रधान मोदींनी जुलै 2017 मध्ये देशवासियांकडून मागवलेल्या सुचनांनुसार संक्षिप्त भाषण करणार असल्याचं सांगितलं होतं. भाषण जरा जास्त मोठं होत असल्याचं काही पत्रांमध्ये म्हटल्याचं मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितलं होतं. त्यामुळे यावेळी सर्वात छोटं भाषण देण्याचं वचन मोदींनी दिलं होतं. त्यानुसार मोदींनी वचन पूर्ण करत 2014 मध्ये ते पंतप्रधान झाल्यानंतरचं सर्वात छोटं भाषण केलं.
मोदींनी 2014 साली 65 मिनिटे, 2015 साली 86 मिनिटे, 2016 साली 96 मिनिटे आणि 2017 मध्ये सर्वात कमी वेळेत म्हणजे 55 मिनिटांमध्ये भाषण संपवलं. यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात 50 मिनिटांच्या आतच भाषण पूर्ण केलं. तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 30 ते 35 मिनिटे देशाला संबोधलं होतं.
संबंधित बातम्या :