= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स. भोसरी एमआयडीसी भुखंड प्रकरणात चौकशीसाठी उद्या हजर रहाण्याचं समन्स. आज त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. याअगोदर जानेवारी महिन्यात या प्रकरणात ईडीने खडसेंची चौकशी केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजप नेते नारायण राणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांचा जल्लोष नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थका समवेत भाजप कार्यकर्तेमध्ये जल्लोष
करण्यात आले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान, यादीत पहिलं नाव नारायण राणेंचं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : ज्योतिरादित्य सिंधिया यांची शिक्षणमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता PM Modi Cabinet Expansion : ज्योतिरादित्य सिंधिया यांची शिक्षणमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रमेश पोखरियाल निशंक यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणमंत्री पद रिकामं असून सिंधिया यांची वर्णी लागू शकते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : उत्तर प्रदेशातून या मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता PM Modi Cabinet Expansion : उत्तर प्रदेशातून पाच नव्या चेहऱ्यांना मोदी मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे. अनुप्रिया पटेल, कौशल किशोर, अजय मिश्रा, एसपीएस बघेल आणि बीएल वर्मा या नावांचा समावेश आहे. तसेच महेंद्र पांडे यांचं मंत्रिमंडळ बदललं जाऊ शकतं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : महाराष्ट्रातून दोन मंत्र्यांचा राजीनामा, सुत्रांची माहिती सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या कोट्यातून मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय दोत्रे यांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. दरम्यान, अद्याप यासंदर्भात कोणतंही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : या मंत्र्यांना मिळू शकते मंत्रिमंडळात बढती किरण रिजिजू, मनसुख मांडिया, जी किशन रेड्डी, अनुराग ठाकुर, पुरुषोत्म रुपाला आणइ हरदीप सिंह पुरी यांना मंत्रिमंडळात बढती मिळण्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा PM Modi Cabinet Expansion : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी आरोग्यविषयक समस्यांमुळे राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : सुशील मोदी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता कमी PM Modi Cabinet Expansion : सुशील मोदी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या शर्यतीतून जवळपास बाहेरच पडले आहेत. ते सध्या पाटनामध्ये असून त्यांना अद्याप दिल्लीहून बोलावणं आलेलं नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळात अनुसूचित जातींच्या 12 मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता PM Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळात अनुसूचित जातींच्या 12 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. हे सगळे नेते 8 वेगवेगळ्या राज्यांतील असणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारकडून सहकार क्षेत्रासाठी नव्या मंत्रालयाची निर्मिती PM Modi Cabinet Expansion : केंद्रातील मोदी सरकारनं मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून नव्या मंत्र्यांचे शपथविधी केले जाणार आहेत. 'सहकारातून समृद्धी' या दृष्टीने सरकारनं सहकार मंत्रालयाची (मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन) स्थापना केली आहे. हे मंत्रालय देशातील सहकार्यासाठी प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट मजबूत करण्याच्या दृष्टीनं काम करणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : महाराष्ट्रातून 'या' नेत्यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता PM Modi Cabinet Expansion : पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 जुलै रोजी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जवळपास 17 ते 22 नवीन मंत्र्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. काही मंत्र्यांना अतिरिक्त मंत्रीपदाचा कार्यभारही मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक मंत्र्यांची नावं मंत्रिमंडळातून कमी होतील असाही एक अंदाज वर्तवला जातोय. मंत्रिमंडळात सामील होण्याची चर्चा असणारे नेते आता हळूहळू दिल्लीत पोहोचू लागले आहेत, राज्यातून खासदार नारायण राणे दिल्ली पोहोचले आहेत. राज्यातील इतर अनेक नावांची चर्चा आहे.
कपिल पाटील, हिना गावित, रणजीत निंबाळकर, भागवत कराड यांची नावे देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. कपिल पाटील सध्या दिल्लीत आहेत. एबीपी माझाने त्यांचा संपर्क साधला असता ओबीसी संसदीय समितीची उद्या बैठक आहे, त्यासाठी दिल्लीला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नारायण राणे देखील दिल्लीत आहेत. नारायण राणे यांना भाजपचे राष्ट्रीय अ्ध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यास सांगण्यात आलं आहे. रणजीत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईतच होते, मात्र आता ते फलटणला निघाले असल्याची माहिती मिळत आहे. भागवत कराड देखील मुंबईतच आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : सध्याच्या मंत्रिमंडळातील नेंत्यांवरील अतिरिक्त मंत्रिपदाचा भार कमी करण्याची शक्यता PM Modi Cabinet Expansion : ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दिल्लीतून त्यांना फोन आला असून संध्याकाळपर्यंत ते दिल्लीत पोहोचतील. तसेच वरुन गांधी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. संभाव्य फेरबदलात अनेक मंत्र्यांची नावं कमी केली जाऊ शकतात, तर काहींचा मंत्रिपदाचा भार कमी केला जाऊ शकतो. यामध्ये नरेंद्र सिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि प्रह्लाद जोशी यांच्याकडील अतिरिक्त मंत्रालयाची जबाबदारी कमी केली जाऊ शकते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्रिपदं रिक्त PM Modi Cabinet Expansion : शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर निघाले. तसेच रामविलास पासवान आणि इतर काही मंत्र्यांच्या निधनानंतर सर्व मिळून अनेक मंत्रिपदे रिक्त आहेत. सध्या मोदी मंत्रिमंडळात फक्त 53 मंत्री आहेत. तर घटनेनुसार मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त 79 असू शकते. त्यामुळे सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 26 मंत्रिपदं रिक्त आहेत. तिथे कुणाची वर्णी लागणार येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कसं असेल पंतप्रधान मोदींचं नवं मंत्रिमंडळ? मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून महिलांचे प्रतिनिधित्व वाढविले जात आहे. प्रोफेशनल, मॅनेजमेंट, एमबीए, पदव्युत्तर युवा नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. मोठ्या राज्यांना अधिक वाटा देण्यात येईल. बुंदेलखंड, पूर्वांचल, मराठवाडा, कोकण या भागांना वाटा देण्यात येईल अशी चर्चा आहे.
मंत्रिमंडळात लहान समुदायांना देखील प्रतिनिधित्व दिले जात आहे. यावेळी यादव, कुर्मी, जाट, पासी, कोरी, लोधी इत्यादी समाजाचे प्रतिनिधित्व दिसेल. या विस्तारानंतर दोन डझन ओबीसी किंवा मागासवर्गीय मंत्री यावेळी मंत्रिमंडळात दिसतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
PM Modi Cabinet Expansion : आज संध्याकाळी 6 वाजता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार PM Modi Cabinet Expansion : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. मोदी कॅबिनेटमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहे. असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मोदी सरकार 2.0 मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. 7 जुलै, म्हणजेच आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.