PM Narendra Modi America Visit:  अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान्यांची सत्ता आली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  अमेरिकेच्या दौऱ्यावर सध्या संपूर्ण जगाती नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात अनेकांना भेटणार आहे. जाणून घेऊया पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण दौऱ्याबद्दल


पंतप्रधान मोदी 23 सप्टेंबरला अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी 9:40 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी  7:15) हॉटेलमध्ये वेगवेगळ्या सीईओंना भेटणार आहे. यामध्ये क्वालकॉमचे अध्यक्ष, एडोबचे चेअरमन, फर्स्ट सोलरचे सीईओ, जनरल अॅटोमिक्सचे सीईओ आणि ब्लॅकस्टोनचे संस्थापक यांचा समावेश आहे.


23 सप्टेंबरचे वेळापत्रक


दुपारी जेवणानंतर अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी  1:30 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी  11 वाजता) पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात हॉटेलमध्येच चर्चा होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान  अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी  3  वाजता अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भेटीसाठी जातील. दोन्ही नेत्यांमध्ये दुपारी  3:15 (भारतीय वेळेनुसार रात्री 12:45 ) बैठक होईल. ही बैठक किमान तासभर चालेल. त्यानंतर पंतप्रधान पुन्हा हॉटेलवर येतील.अमेरितील वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता  (भारतीय वेळेनुसार रात्री 3 वाजता) पंतप्रधान मोदी जपानचे पंतप्रधान  योशीहिदे सुगा यांची भेट घेणार आहेत. 


24 सप्टेंबरचे वेळापत्रक
 
अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी  11 वाजता पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चेसाठी व्हाईट हाऊस येथे जातील. त्यानंतर ही शिखर चर्चा एक तास चालेल. त्यानंतर मोदी पुन्हा हॉटेलमध्ये परततील. हॉटेलमध्ये दुपारी जेवणानंतर अमेरिकन वेळेनुसार दोन वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ११.३० वाजता) अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात QUAD च्या बैठकीत सहभागी होण्याकरता पुन्हा व्हाईट हाऊसला येतील


QUAD ची बैठक दोन चालेल. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेसाठी न्यूयॉर्क येथे रवान होतील. न्यूयॉर्क येथे पंतप्रधान मोदी मॅनहॅटन येथील प्रसिद्ध लोटे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेल येथे थांबतील, 25 सप्टेंबरला सकाळी अमेरिकेतील वेळेनुसार  9 वाजता संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील. त्यानंतर भारतात परततील.