नवी दिल्ली: 'काश्मीर खोऱ्यातील हिंसाचारात ज्यांना जीव गमवावा लागला ते आपलेच बांधव आहेत. ते आपल्याच देशाचा भाग आहेत.' अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.


 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी मोदींनी काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत चिंता आणि दु:ख व्यक्त केलं. काश्मीरमधील परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संवादाची गरज असल्याचं यावेळी मोदींनी सांगितले.

 

काश्मीरमध्ये स्थानिक तरूणांचा, लष्कारातील जवान किंवा पोलीस कोणाचाही बळी गेला तरी आम्ही अस्वस्थ होतो असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

 

दरम्यान, या बैठकीत ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींसमोर काश्मीरमधील परिस्थितीचा अहवाल सादर केला. काश्मीरमध्ये त्वरित पेलेट गन्सच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.