नवी दिल्ली :   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (14 फेब्रुवारी) चेन्नईचा दौरा केला. चेन्नईला पोहचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर एम.ए. चिदंबरम स्टेडियम जवळून गेले. त्यावेळी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरू होता. या वेळी त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. पंतप्रधानांनी सामन्याचा फोटो हेलिकॉप्टरमधून टिपला असून तो फोटो ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, "हेलिकॉप्टरमधून या रोमांचक सामन्याचे दृश्य पाहिले".





गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत आपली पकड मजबूत बनवली आहे. इग्लंडचा पहिला डाव केवळ 134 धावांवर आटोपल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत आपल्या दुसऱ्या डावात एक विकेट गमावत 54 धावा केल्या. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाकडे एकूण 249 धावांची आघाडी आहे.

रोहित शर्माने दुसर्‍या कसोटी सामन्यात 161 धावांची शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा गडी गमावत 300 धावा केल्या आहेत. मैदानावर ऋषभ पंत 33 आणि अक्षर पटेल पाच धावांवर नाबाद परतला. रोहित शर्माशिवाय अजिंक्य रहाणेनेही भारताकडून 67 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संबंधित बातम्या :