PM Modi Return India : इटली आणि ब्रिटनचा संपूर्ण दौरा पूर्ण केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 8.15 वाजता दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. भारतीय वेळेनुसार, पंतप्रधान मोदी मंगळवारी रात्री 11 वाजता ग्लासगोहून दिल्लीसाठी रवाना झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलवायू शिखर सम्मेलनात जगभरातील अनेक दिग्गजांसह दोन दिवसांच्या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. ते म्हणाले की, भारतानं पेरिस प्रभावांना पार पाडले आहे, तसेच आता पुढील 50 वर्षांसाठी एक महत्वाकांक्षी एजेंडा देखील निर्धारित केला आहे.


पंतप्रधान मोदींनी रोम आणि ग्लासगोमधील आपला पाच दिवसीय दौरा पूर्ण केल्यानंतर भारतासाठी रवाना झाले आहेत, त्यावेळी त्यांना एक ट्वीट केलं. त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, त्यांनी रोममध्ये जी-20 शिखर सम्मेलनात सहभाग घेतला होता. तर ग्लासगोमध्ये सीओपी-26 जलवायू शिखर सम्मेलनात सहभागी झाले होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं आहे, त्यामध्ये ते म्हणाले की, "आपला ग्रह पृथ्वीच्या भविष्याबाबत दोन दिवसांच्या ग्लासगो येथील चर्चेतून प्रस्थान." पुढे ते म्हणाले की, बऱ्याच काळानंतर अनेक जुन्या मित्रांना समोरासमोर पाहणं आणि काही नव्या लोकांची भेट होणं विलक्षण होतं. मी या कार्यक्रमाचे आयोजन करणारे पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि मनोरम ग्लासगो यांचा आभारी आहे. तसेच पाहुणचारासाठी स्कॉटलँडच्या नागरिकांचाही आभारी आहे."


स्वेदशी परतताना पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी विमानतळावर भारतीयांची गर्दी जमा झाली होती. यादरम्यान भारत परतण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय समुदायाच्या सदस्यांसोबत ड्रम वाजवला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथ दौऱ्यावर


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला उत्तराखंड येथे जाऊन केदरनाथचे दर्शन घेणार आहे. मोदी सकाळी सकाळी डेहराडूनवरून केदरनाथला रवाना होणार आहे. दरम्यान शेवटच्या मिनिटाला जर हवामानात बदल झाले तर कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी केदरनाथ मंदिरात सकाळी 7.30 वाजता पूजा करणार आहे. पूजा झाल्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन करणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री मोदी श्री आदि शंकराचार्यांचे प्रतिमाचे अनावरण करणार आहे. 2013 च्या पूरानंतर आदि शंकराचार्यांच्या समाधीचे पुनर्निमाण केले गेले.


केदरनाथधाम यात्रेच्या क्षणाला  ऐतिहासिक करण्यासाठी भाजपने एक राष्ट्रव्यापी योजना बनवली आहे. चार धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरे असे मिळून एकूण 87 मंदिरात साधू, भक्तांना आणि नागरिकांना आमंत्रित केले होते. 


प्रधानमंत्री मोदी मंदिरात पूजा , श्री आदि शंकरचार्यांच्या समाधी आणि प्रतिमेचे अनावरण झाल्यानंतर देशाला संबोधित करणार आहे. प्रधानमंत्री  संबोधनाचे 87 एलईडी स्क्रीन आणि बिग स्क्रीनवर प्रसारित करण्यात येणार आहे. श्री आदि शंकराचार्य मंदिरात पोहचण्याचा मार्गावर 87 मंदिरात भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे.