PM Modi on Rahul Gandhi : नवी दिल्ली : तेलंगणातील (Telangana) करीमनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला. काँग्रेसनं अचानक अदानी (Adani) -अंबानींची (Ambani) नावं घेणं का बंद केलं? राजकुमारानं अदानी-अंबानींकडून किती वसुल केले? निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी (PM Modi) राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधत प्रश्न उपस्थित केलेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "तुम्ही पाहिलं असेल की, गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे राजकुमार सकाळी उठल्याबरोबर जपमाळ जपायला सुरुवात करत होते. जेव्हापासून त्यांचं राफेल प्रकरण चर्चेत आलं, तेव्हापासून त्यांनी नवी जपमाळ हातात घेतली, पाच वर्ष एकच जपमाळ जपायचे. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती... मग हळूच म्हणू लागले, अंबानी-अदानी. मात्र निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदानींना शिव्या देणंच बंद केलंय, असं का?"






अचानक अंबानी-अदानींचं नाव घेणंच बंद केलंय : पंतप्रधान 


पंतप्रधान मोदींनी बोलताना काँग्रेसला थेट आव्हान देखील केलंय. राजकुमारांनी जाहीर करावं की, त्यांनी अदानी-अंबानींकडून किती वसूल केलेत? असा थेट वार पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केला आहे. मोदी पुढे बोलताना म्हणाले की, "तुमच्याकडे किती काळा पैसा आहे? टेम्पो भरून नोटा काँग्रेसपर्यंत पोहोचल्यात का? काय डील केलीत? तुम्ही रातोरात अंबानी-अदानींना शिव्या देणं बंद केलं. दाल में कुछ काला है... पाच वर्ष अत्याचार केले आणि ते रातोरात थांबले. याचाच अर्थ, टेम्पो भरुन तुम्हाला चोरीचा माल सापडला आहे, याचे उत्तर देशाला द्यावंच लागेल."


"देश बुडाला तर बुडला, त्यांना काहीही फरक पडत नाही"


पंतप्रधान मोदी म्हणाले की, "तेलंगणाच्या निर्मितीवेळी येथील लोकांनी बीआरएसवर विश्वास ठेवला होता. बीआरएसनं लोकांची स्वप्न मोडली. काँग्रेसचाही तोच इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनंही तेच केलं. देश बुडला तर बुडतो, पण त्याच्या कुटुंबाला काहीच फरक पडत नाही. फॅमिली फर्स्टच्या धोरणामुळे काँग्रेसनं पीव्ही नरसिंह राव यांचा अपमान केला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला काँग्रेस कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. पीव्ही नरसिंह राव यांना भाजप सरकारनं भारतरत्न देऊन गौरवलं."