Increase in demand for AC : सध्या तापमानात मोठी वाढ  (temperature Increase) झालीय. बहुतांश भागातील तापमान हे 40 अशांच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानामुळं थंडगार हवेसाठी AC च्या मागणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. AC ची विक्री करणाऱ्या प्रमुख पाच कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ झालीय. व्होल्टास ते ब्लू स्टारपर्यंतच्या कंपन्यांच्या शेअर्सवर चांगला परतावा मिळत आहे.


दरम्यान,  टाटा समूहाची व्होल्टास ही भारतातील सर्वात लोकप्रिय एसी कंपन्यांपैकी एक आहे. याचबरोबर व्होल्टास, शार्प आणि अंबर या कंपन्याही देखील आहे. या सर्व कंपन्यांच्या एसीच्या मागणीत वाढ झालीय. या कंपन्यांना या माध्यमातून मोठा परतावा मिळत आहे. या कंपन्यांच्या शेअर्सने चांगलीच तेजी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


चांगला परतावा देणाऱ्या 5 AC कंपन्या कोणत्या?


व्होल्टास


जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांपैकी टाटा समुहाची व्होल्टास ही एसीची मोठी कंपनी आहे. या कंपनीने गेल्या वर्षभरात चांगला परतावा दिला आहे. या कंपनीच्या समभागांनी वर्षभरात 72.12 टक्के परतावा दिला आहे.  या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या कंपनीचे भाग भांडवले हे 45,941 कोटी रुपये आहे. 


ब्लू स्टार


ब्लू स्टार या कंपनीने गेल्या वर्षभरात 101.49 टक्के परतावा दिलाय. या कंपनीचा शेअर्स 1514 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीचे भाग भांडवल हे 29,638 कोटी रुपये आहे. 


अंबर एंटरप्रायझेस


व्यावसायिक एसीच्या जगात ही कंपनी खूप लोकप्रिय आहे. या कंपनीचे भाग भांडवल हे13,407 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीच्या शेअरच्या किमतीने 115.94 टक्के परतावा दिला आहे.


जॉन्सन कंट्रोल्स


जॉन्सन कंट्रोल्स या एसी बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनेही गेल्या एका वर्षात 7 टक्के परतावा दिलाय. त्याचे बाजार भांडवल 3200 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


सुब्रोस लिमिटेड


सुब्रोस लिमिटेड या व्यावसायिक एसी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने एका वर्षात 86.88 टक्के परतावा दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 3,922 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


देशात दिवसेंदिवस तापमानात चांगलीच वाढ


दरम्यान, देशात दिवसेंदिवस तापमानात चांगलीच वाढ होत आहे. या तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


महाराष्ट्र तापला! अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे, अकोल्यात पारा 44 वर