PM Modi : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे. भाजपमध्ये (BJP) देखील सातत्याने बैठकांचा सिलसिला सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी (3 ऑगस्ट) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बिहारमधील खासदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी NDA म्हणजे स्थिरता, त्यामुळेचं देशाच्या राजकारणाला स्थैर्य प्राप्त झाल्याचं वक्तव्य केलं. यावेळी मोदींनी खासदारांना निवडणुकीत विजयाचा मंत्र दिला आहे. 


मोठ्या ध्येयासाठी अनेकदा त्याग करावा लागतो


बिहारमध्ये NDA च्या खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी तुम्ही तुमच्या भागात जा आणि काम करा, कारण आता निवडणुकीला जास्त वेळउरला नसल्याचे खासदारांना सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी एनडीएची एकता, त्याग आणि स्थिरतेचा उल्लेख केला. एनडीए म्हणजे स्थिरता. त्यामुळं देशाच्या राजकारणाला स्थैर्य प्राप्त झाले असल्याचे मोदी म्हणाले. राजकारणात अनेक वेळा मोठ्या ध्येयासाठी त्याग करावा लागतो. यासाठी भाजप नेहमीच तयार आहे. भाजपने यासाठी अनेक वेळा त्याग केला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


बिहारमध्ये भाजपला जास्त जागा मिळूनही आम्ही नितीशकुमारांना मुख्यमंत्री केलं 


NDA मजबूत करण्यासाठी आम्ही प्रादेशिक पक्षांना पुढे केले आहे. बिहारमध्ये आम्हाला जास्त जागा मिळाल्यानंतर आम्ही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. महाराष्ट्रातही आमच्या जास्त जागा आहेत. तरीही आम्ही दुसऱ्या पक्षाला पूर्ण सन्मान दिला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंजाबमध्येही आम्ही प्रादेशिक पक्ष मजबूत करण्यात मदत केल्याचे ते म्हणाले. भाजप NDA आघाडीत त्यागाच्या भावनेने काम करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या सरकारनंतर पहिल्यांदाच केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार असल्याचा उल्लेख देखील पंतप्रधानांनी यावेळी केला. 


केंद्र सरकारच्या योजनांची शेतकऱ्यांना योग्य माहिती देणं गजेचं


या बैठकीत पंतप्रदानांनी सिक्कीमधील एका शेतकऱ्यांसोबतचा अनुभव सांगितला. जेव्हा मी सिक्कीमधील एका गावात जाऊन शेतकऱ्यांना किसान निधीचे पैसे मिळतात का? असे विचारले तेव्हा शेतकऱ्यांनी रक्कम मिळत नसल्याचे सांगितले. पण वस्तुस्थिती अशी होती की शेतकरी किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होते. याची त्यांना जाणीव नव्हती असे पंतप्रधान म्हणाले. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या योजनांची शेतकऱ्यांना योग्य माहिती देणं आणि जागृत करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींची जादू पुन्हा चालणार? ताज्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष समोर, भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पारड्यात किती जागा?