नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 28 फेब्रुवारी रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. देशात पुन्हा वाढत असलेला कोरोना, कोरोना लसीकरण, आणि अजूनही सुरु असलेलं शेतकरी आंदोलन याबाबत पंतप्रधान मोदी आज बोलण्याची शक्यता आहे. याआधीच्या मन की बात कार्यक्रमात मोदी यांनी प्रजासत्ताक दिनावेळी शेतकऱ्यांच्या रॅली वेळी झालेला हिंसा पाहून ज्या पद्धतीने तिरंग्याचा अपमान झाला त्याचे दु:ख मोदी यांनी व्यक्त केले होते


पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 31 जानेवारीच्या मन की बातमध्ये बोलताना त्यानंतर 26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करत दु:ख व्यक्त केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "या सर्व घडामोडींमध्ये दिल्लीत 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान पाहून देश अत्यंत दुखी झाला." कोरोना संकटावर बोलताना म्हणाले होते की, "कोरोना विरोधात भारताची लढाई जगासमोर एक उदाहरण बनली आहे. अशातच आपली लसीकरण मोहीमही जगभरात एक उदाहरण आहे. संकटकाळात भारत स्वतः आत्मनिर्भर असल्यामुळे इतर देशांचीही मदत करु शकला."


2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 74 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. 27 डिसेंबर रोजी प्रसारित होणारा 'मन की बात' हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम असेल.