PM Modi Launched Mera Yuva Bharat Portal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवाळीपूर्वी तरुणांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधानांनी 'मेरा युवा भारत पोर्टल' लाँच केलं आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी हे पोर्टल लाँच केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबरला दिल्लीतील मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात 'मेरा युवा भारत पोर्टल' व्हर्च्यूअली (Virtually) लाँच केलं. 'माती मेरा देश' मोहिमेचा समारोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे अमृत कलशात माती अर्पण केली.
मेरा युवा भारत पोर्टल सुरू
'मेरा युवा भारत'बाबत पंतप्रधान रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात म्हणाले होते की, 'मेरा युवा भारत' भारतातील तरुणांना विविध राष्ट्र निर्माण कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देईल. विकसित भारताच्या उभारणीत भारतातील युवाशक्तीला एकत्रित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.
मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जेव्हा हेतू चांगला असतो आणि राष्ट्राची भावना प्रथम सर्वोपरी असते, तेव्हाच परिणाम सर्वोत्तम असतात. 'आझादी का अमृत महोत्सव' दरम्यान, भारताने अनेक ऐतिहासिक कामगिरी केली. 'आझादी का अमृत महोत्सवा' दरम्यान देशाने राजपथ ते कर्तव्यपथ हे अंतर कापलं"
'मेरी माती मेरा देश' मोहिम काय आहे?
'मेरी माती, मेरा देश' मोहीम ही सर्वोच्च बलिदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली आहे. स्वदेशी प्रजातींची लागवड आणि अमृत वाटिकe विकसित करणे, स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांच्या कुटुंबीयांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. यादरम्यान पीएम मोदी अमृत कलश यात्रेच्या समारोपात सहभागी झाले. आझादी का अमृत महोत्सवाचा समारोप समारंभही या कार्यक्रमात पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी 'कर्तव्य पथ'वर ठेवलेल्या भारत कलशला आदरांजली वाहिली आणि अमृत वाटिका आणि मातीपासून बनवलेल्या अमृत महोत्सव स्मारकाची पायाभरणी केली.
'मेरी माती, मेरा देश' मोहीम ही त्या सैनिकांना श्रद्धांजली आहे, ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. या मोहिमेमध्ये स्वदेशी प्रजातींची लागवड आणि अमृत वाटिक विकसित करणे, यासोबतच स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांच्या कुटुंबीयांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.
काय आहे अमृत कलश यात्रा?
'मेरी माती मेरा देश' मोहिमेत अमृत कलश यात्रेचाही समावेश आहे. अमृत कलश यात्रेसह 6 लाखांहून अधिक गावे आणि शहरी भागातील माती आणि तांदळाचे धान्य राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आणण्यात आलं आहे. मंत्रालयाने सांगितलं की, या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान देशातील तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आलं.
2.63 लाख अमृत वाटिका
'मेरी माती, मेरा देश मोहिमेअंतर्गत देशभरात 2 लाखांहून अधिक 'वीर का वंदन' कार्यक्रम आयोजित करण्यात आले होत. यावेळी स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांच्या कुटुंबीयांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले. त्याशिवाय 2.36 कोटींहून अधिक देशी रोपांची लागवड करण्यात आली. तसेच, वसुधा वंदन थीम अंतर्गत देशभरात 2.36 लाख अमृत वाटिका तयार करण्यात आल्या. तसेच 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2.3 लाखांहून अधिक शिलास्मारक बांधण्यात आले आहेत. यावेळी, 4 कोटींहून अधिक सेल्फी अपलोड केले गेले.