मुंबई : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्किम आणि आसम या पाच राज्यात 5,939 कोटी रुपये खर्चून 8 राज्यमहामार्ग उभारण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या एका उच्च स्तरीय समितीने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इएफसी, एसएफसी (व्यय-वित्त समिती) स्थायी वित्त समितीने एकूण 5,939 कोटींच्या रस्ते बांधणीच्या 8 उपक्रमांना शुक्रवारी मंजूरी दिली आहे. यातील चार उपक्रमांची निर्मिती हायब्रिड एन्यूटी मोडने करण्यात येणार असून दोन उपक्रमांची उभारणी इपीसी (इंजिनिअरिंग खरेदी आणि निर्माण)तत्त्वावर करण्यात येणार आहे.
या 5,939 कोटीच्या उपक्रमातील 4,876 कोटी रुपयांच्या चार योजनांना महाराष्ट्रासाठी मंजूरी देण्यात आली आहे.