गांधीनगर : गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरच्या विमानतळाप्रमाणे सुसज्ज असलेल्या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकाबरोबरच पंतप्रधानांनी गांधीनगर राजधानी-वाराणसी सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गांधीनगर राजधानी- वरेठा दरम्यान एमईएमयू या दोन नव्या ट्रेनला हिरवा झेंड दिला. तसेत पंतप्रधानानी वडनगर येथील रेल्वेस्थानकाचे देखील उद्घाटन केले. जेथे पंतप्रधान मोदी लहानपणी चहा विकायचे.
गांधीनगरमध्ये देशातील पहिले एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सुसज्ज असे रेल्वेस्थानक उभारण्यात आले आहे. विशेष प्रकाशयोजन, लक्झरी हॉटेल, लहान मुलांच्या खाण्यापिण्यासाठी खोली अशा अनेक सुविधांनी सुसज्ज असे हे रेल्वेस्थानक आहे. दीड हजास प्रवासी येथून एकाच वेळी प्रवास करु शकतात. गर्दी वाढल्यास दोन हजार दोनशे प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता या रेल्वे स्थानकात आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष तिकिट आरक्षण, लिफ्ट, रॅम्प तसेच वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. येत्या काळात मनोरंजन केंद्रे, शॉपिंग सेंटर, खाद्यपदार्थाचे स्टॉल उघडण्याचे येथे नियोजन आहे. स्टेशन आवारात कलादालन देखील आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार गांधीनगर राजधानी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी 71 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. गांधीनगर कॅपिटल पहिला स्टेशन आहे जिथं स्टेशनवर फाईव्ह स्टार हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. स्टेशनवर आल्यानंतर प्रवाशांना विमानतळावर आल्याचीच भावना निर्माण होईल अशी याची निर्मिती केली आहे. पंतप्रधान मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो.
गांधीनगर राजधानी रेल्वे स्टेशनमधील विशेष गोष्टी
- दिव्यांग व्यक्तिंसाठी एक विशेष तिकिट खिडकी, रॅम्प, सुरक्षित पार्किंग व्यवस्था
- संपूर्ण इमारतीला हरित भवनच्या स्वरुपात डिझाईन केलं आहे.
- स्टेशनवर अत्याधुनिक थीमवर आधारित लायटिंगची व्यवस्था केली आहे. ज्यात 32 थीम आहेत.
- स्टेशन परिसरात फाईव्ह स्टार हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये 318 खोल्या आहेत.
- अत्याधुनिक अॅक्वाटिक गॅलरीच्या टॅंकमध्ये जगभरातील विविध प्रजातींचे जलचर प्राणी असतील.
- गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशन आणि हॉटेलमध्ये सामाजिक तसेच पारिवारिक समारंभांच्या आयोजनासाठी वातानुकूलित हॉल आणि 1100 मीटर ओपन स्पेस ठेवण्यात आला आहे.
- स्टेशनवर तीन प्लॅटफार्म, दोन एस्कलेटर्स, तीन एलिव्हेटर व दोन प्रवाशी सबवे बनवण्यात आले आहेत.
- सोबतच आठ आर्ट गॅलरी आहेत ज्यामध्ये गुजरातच्या ऐतिहासिक स्थळांची आणि लोककलांची माहिती देणारं प्रदर्शन असेल.