बंगळुरु : एमबीए करण्यासाठी कोणतीही बँक कर्ज देत नसल्याने कर्नाटकमधील एका 21 वर्षीय तरुणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिलं. मोदींना पत्र लिहिल्यानंतर या तरुणीला अवघ्या 10 दिवसातच मदत मिळाली.

https://twitter.com/ANI_news/status/844756357483970560

सारा असं या तरुणीचं नाव आहे. शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी तिने सर्व बँकांचे दरवाजे ठोठावले. मात्र गरिबीमुळे कोणतीही बँक मदत देत नव्हती. अखेर साराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून आपली व्यथा मांडली. त्यानंतर तिला अवघ्या 10 दिवसात मदत मिळाली.

https://twitter.com/ANI_news/status/844755837969039360

पंतप्रधान मोदी यांनी अनेकांच्या पत्राला उत्तर दिल्याचं ऐकिवात आहे. त्यामुळे आपल्यालाही ते मदत करतील, अशी खात्री होती. मात्र एवढ्या लवकर मदत मिळेल, असं वाटलं नव्हतं, असं साराने सांगितलं.