PM Modi France Visit : सिंगापूरनंतर आता फ्रान्सनेही भारताची युनिफाइड पेमेंट सिस्टम (UPI) स्वीकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फ्रान्सच्या दौऱ्यावर ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, UPI च्या वापरावर भारत आणि फ्रान्सचे एकमत झाले आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसांत प्रसिद्ध आयफेल टॉवरपासून UPI ​​सुरू होईल." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेचा अर्थ असा आहे की, आता भारतातून फ्रान्सला जाणारे पर्यटक भारतीयांना फ्रान्समध्ये UPI द्वारे रुपयात पैसे देता येणार आहेत. याशिवाय फ्रान्सनेही भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसाची मुदत वाढवण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. 


UPI सह प्रवास सुकर होईल


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या आधी, असे सांगण्यात आले होते की, UPI बाबत भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांमध्ये बराच काळ चर्चा सुरू होती. त्यानंतर ते एखाद्या प्रसिद्ध ठिकाणाहून लॉन्च केले जाऊ शकते. काही तासांनंतर, पीएम मोदींनी याला मंजुरी दिली आणि काही दिवसांतच, फ्रान्स हा UPI वापरणारा पहिला युरोपियन देश बनेल असे सांगितले. आतापर्यंत परदेशात जाण्यासाठी दोन परकीय चलन (रोख) किंवा फॉरेक्स कार्ड मिळविण्याचा त्रास होत होता. आता या सगळ्यातून सुटका करण्यासाठी UPI महत्त्वाचं ठरणार आहे. 


2022 मध्ये, UPI सेवा प्रदान करणारी प्रमुख संस्था, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फ्रान्सच्या जलद आणि सुरक्षित ऑनलाईन पेमेंट सिस्टम 'Lyra' सोबत करार केला होता. तेव्हापासून फ्रान्समध्ये UPI लाँच होण्याची वाट पाहिली जात होती. मात्र, 


 विद्यार्थी व्हिसावरही सूट


पंतप्रधान मोदीं यांच्या फ्रान्स दौऱ्यात भारतीय विद्यार्थांनाही दिलासा देण्यात आला आहे. या भाषणात असे सांगण्यात आले की, मास्टर्स करत असलेल्या विद्यार्थ्यांचा व्हिसाचा कालावधी आता 5 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे. याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'फ्रान्सने पदव्युत्तर (मास्टर्स) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दीर्घकालीन पाच वर्षांचा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे.' भारतीय समुदायातील लोकांना भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येण्यासाठी वेगाने प्रगती करत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Chandrayaan-3 : 'चांद्रयान-3' प्रक्षेपणाच्या आधी इस्रो प्रमुखांनी मंदिराला दिली भेट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, यूजर्स म्हणाले...