मुंबई : मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनसाठी रवाना झाले आहेत. चीनमध्ये यावर्षी ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जीनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. डोकलाम सीमाप्रश्नावरून भारत-चीनमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे.

मोदींनी 2014 साली पंतप्रधानपदी विराजमान होताच आंतरराष्ट्ररीय संबंधांवर जास्त भर दिला. मोदींनी सलग अनेक देशांचे दौरे केले. काही दिवसांपूर्वीच मोदींनी इस्रायल दौरा केला, जो भारतीय पंतप्रधानाचा पहिलाच दौरा होता.

मोदींच्या परदेश दौऱ्यावर अनेकदा टीका करण्यात येते. मोदी भारतात कमी आणि परदेशात जास्त असतात, अशी टीकाही विरोधकांकडून केली जाते. मात्र मोदी कोणत्या देशात किती वेळा गेले असतील हे पाहायचं असेल तर ते एका क्लिकवर पाहू शकता.

गुगल मॅपवर मोदींचे परदेश दौरे देण्यात आले आहेत. या मॅपवर क्लिक करुन तुम्ही मोदींचे परदेश दौरे पाहू शकता.

पाहा गुगल मॅप :