Rozgar Mela : रोजगार मेळाव्याच्या (Rozgar Mela) दुसऱ्या टप्प्यात आज 71 हजार पेक्षा जास्त तरूणांना नोकरी मिळाली आहे. नोकरी मिळालेल्या युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांच्या हस्ते आज विविध ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले आहे. देशभरातील 75 ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी पुण्याच्या अमित कांबळे या युवकाला देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. 


रोजगार मेळाव्या अंतर्गत केंद्र सरकारमध्ये देशभरातील जवळपास दहा लाख युवकांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून वाटप करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रांमध्ये यूपीएससी, एसएससी, रेल्वे भरती बोर्ड यांसारख्या अनेक विभागांचा समावेश आहे. यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी 75 हजार युवकांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली होती. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात जवळपास 71 हजार हून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. युवकांना नियुक्ती पत्र देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. 






यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकार सरकारी नोकऱ्यांमध्ये रोजगार देण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले. "आज 71 हजार हून अधिक युवकांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत. आता 28 नोव्हेंबर रोजी गोवा आणि त्रिपुरामध्ये देखील रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. भारत हे जगाचे उत्पादन केंद्र बनणार असून सरकारने अंतराळ क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करण्याची संधी दिली आहे, असे मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.  


विरोधकांवर निशाणा 


यावेळी केंद्रीय मंत्री जितेंज्र सिंह यांनी विरोधकांवर टीका केली आहे. युवकांना रोजगार दिल्याबद्दल पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या आभार मानले पाहिजेत. दहा लाख युवकांना रोजगार देण्याचा शब्द पाळत पंतप्रधान मोदी यांनी आतपर्यंत दोन टप्प्यात जवळपास दीड लाख युवकांना रोजगार दिला आहे. आज ज्यांना नियुक्ती पत्र मिळाले आहे त्यातील अनेक जण विरोधी पक्षातील कुटुंबामधील तरूण आहेत. आता हे लोक काम करणार नाहीत का? असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केलाय.  


महत्वाच्या बातम्या


Rohit Pawar: 'अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागायच्या लायकीचं ठेवणार नाही'; रोहित पवार संतापले