नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे मोदींच्या भाषणातील 'मित्रों' या शब्दाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. पण मोदींनी आपल्या भाषणात यावेळी 'मित्रों' शब्दच वापरला नाही.

महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना नववर्षाचं गिफ्ट, मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे


मोदींनी 'मित्रों' शब्दाला यावेळी 'साथियो' हा पर्याय निवडला. मात्र यामुळे काही जणांची चांगलीच निराशा झाली. कारण मोदींनी भाषणात मित्रो शब्द वापरला असता, तर दिल्लीतील ऑफलाईन या वाईन शॉपमध्ये ग्राहकांना 31 रुपयांत बीअर मिळणार होती. मात्र मोदींच्या 'साथियों' शब्दाने आशा लावून बसलेल्या ग्राहकांची चांगलीच निराशा झाली.

मोदींनी संसदेबाहेर प्री-बजेट भाषण वाचून दाखवलं, विरोधकांची टीका


मित्रो हा शब्द ट्विटरवर मोदींच्या भाषणाअगोदर टॉप ट्रेंडमध्ये होता. अनेक ट्विपल्सने यावर ट्वीट केले होते. मात्र मोदींनी यावेळी मित्रो शब्द न वापरल्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले.

मोदींकडून महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना नववर्षाचं गिफ्ट


पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केलं. या भाषणामध्ये मोदींनी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गरीबांसाठी अनेक महत्वाच्या योजनांची घोषणा केली.

पाहा पंतप्रधान मोदींचं संपूर्ण भाषण :