नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणावर काँग्रेसने टीका केली आहे. मोदींनी प्री-बजेट भाषण वाचून दाखवलंय, अशी टीका काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी केली आहे.

महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना नववर्षाचं गिफ्ट, मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे


पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. त्यावर आता टीका होत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मोदींवर निशाणा साधला. लोकांना आपले पैसे काढण्याची मर्यादा कधी हटणार, याबाबत काही निर्णयाची अपेक्षा होती. मात्र या भाषणाने निराशा झाली, असं केजरीवाल म्हणाले.

मोदींकडून महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना नववर्षाचं गिफ्ट


मोदींनी दिलेली 50 दिवसांची डेडलाईन संपली तरीही परिस्थिती जैसे थे आहे. देशातील आर्थिक आणीबाणी चालूच आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.