नवी दिल्ली : अयोध्येत दिवाळीनंतर आता उत्तर प्रदेश सरकार वाराणसीत देव दिवाळीचं भव्य आयोजन करण्याच्या तयारीत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देव दिवाळीच्या निमित्ताने वारणसीत उपस्थित राहणार आहेत. देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही त्यांच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये उपस्थित राहणार आहेत. असं सांगण्यात येत आहे की, यंदा देव दिवाळीच्या निमित्ताने 11 लाख दिवे वाराणसीत लावण्यात येणार आहेत.
चेतसिंह घाटावर होणार भव्य लेझर शो
यंदा देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासोबतच भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्यासाठी वाराणसीच्या चेतसिंह तटावर भव्य लेझर शोचा सरावही घेण्यात आला. रावण रचित शिव तांजव स्त्रोत्रम् शिव स्तुति, ॐ नमः शिवाय चे उद्घोषांवर भव्य लेझर शोचा सराव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी विशेषतः हा लेझर शो तयार करण्यात आला आहे.
2 वाजून 10 मिनिटांनी वाराणसी पोहोचणार पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी वाराणसीतील बाबतपूर विमानतळावर पोहोचतील. यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरक्षेची व्यवस्था केली आहे. वारणसीच्या डीएम कौशल राज शर्मा यानी सांगितलं की, पंतप्रधानांच्या आगमनआधी सर्व तयारी करण्यासाठी लोकनिर्माण, पर्यटन, नगर निगमसह इतर विभागांसाठीही आदेश जारी करण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वाराणसीत लेजर शो, रोषणाईने गंगाघाट उजळला
8.15 वाजता एअरपोर्टवरून दिल्लीला रवाना होणार
पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5.45 वाजता क्रूजने रविदास तटावर जाण्यासाठी रवाना होतील आणि चेतसिंह तटावर 10 मिनिटांचा लेझर शो दिसतील. रविदास तटावर पोहोचून तिथून गाडीने सारनाथसाठी रवाना होतील. तिथे लाइच अँड साउंड शो पाहतील आणि 8.15 वाजता बाबतपूर विमानतळावरून दिल्लीला परततील.
गंगा स्नान
दरम्यान, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आणि तलावात स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. तर यंदा देव दिवाळी दोन दिवस आहे. त्यामुळे देव दिवाळी 29 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. तर 30 नोव्हेंबर रोजी लोक गंगा, यमुना यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करतील. असं केल्याने मोक्ष प्राप्ती होतं, असं मानलं जातं.