PM Modi Brother Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचे बंधू प्रल्हाद मोदी (Prahlad Modi)  यांचा मंगळवारी कर्नाटकातील (Karnataka) म्हैसूरजवळ (Mysuru) अपघात (Accident)  झाल्याची बातमी समोर येत आहेत. प्रल्हाद मोदी (Prahlad Modi)  आपल्या कुटुंबासह बांदीपूरहून म्हैसूरला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. अपघाताच्या वेळी प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) आणि त्यांचे कुटुंबीय कारमध्ये होते. सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी म्हैसूर (Mysuru) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) पत्नी, मुलगा, सून आणि नातवासोबत मर्सिडीज बेंझ कारमधून बांदीपूर येथे जात असताना दुपारी दोनच्या सुमारास गाडी दुभाजकावर आदळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कडकोलाजवळ दुपारी घडली. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिज्युअलमध्ये कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसत आहे. गाडी बुलडोझरच्या सहाय्याने पळवून नेण्यात आली आहे. पीटीआयच्या सूत्रांनी सांगितले की, म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली आहे.


 










दरम्यान, प्रल्हाद मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू आहेत. ते ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे (AIFPSDF) उपाध्यक्ष आहेत. सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी अनेकदा आंदोलनात भाग घेतला आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रल्हाद मोदी 2001 मध्ये स्थापन झाल्यापासून AIFPSDF शी संबंधित आहेत. पूर्वी ते पीडीएस अंतर्गत रेशन दुकान चालवत होते.