PM Modi Became Most Popular Leader in List of Global Leaders: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जगातील सर्व नेत्यांना मागे टाकलं आहे. जगभरातील 76 टक्के लोकांनी मोदींना जगातील सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय जागतिक नेता म्हणून मत दिलं आहे. दुसरीकडे, या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) 41 टक्के मतांसह सातव्या स्थानावर आहेत, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना 34 टक्के मतं मिळाली असून ते तेराव्या स्थानावर आहेत.


बिझनेस इंटेलिजन्स कंपनी, मॉर्निंग कन्सल्टनं त्यांचं नवं सर्वेक्षण ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगचे (Global Leader Approval Ratings) आकडे प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये पीएम मोदी, जो बायडन, ऋषी सुनक, लोपेज ओब्राडोर यांच्यासह जगातील 22 मोठ्या नेत्यांची नावं आहेत. संस्थेनं 22 मार्च ते 28 मार्च या कालावधीत हे सर्वेक्षण केलं आहे. त्याची आकडेवारी 30 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या सर्वेक्षणातील रेटिंगमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोकृष्ट रेटिंग मिळालं असून सर्वेक्षणानुसार, त्यांचं सर्वात लोकप्रिय नेते म्हणून वर्णन करण्यात आलं आहे.


जागतिक नेत्यांच्या या रेटिंगमध्ये मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांना 61 टक्के मतं मिळाली आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 55 टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बारसेट 53 टक्के मतांसह चौथ्या स्थानावर आहेत. इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा 49 टक्के मतांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.




सर्वेक्षणात 'या' देशांचा समावेश 


मॉर्निंग कन्सल्टंटच्या यादीत समाविष्ट 22 देशांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, फ्रान्स, जर्मनी, भारत, आयर्लंड, इटली, जपान, मेक्सिको, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांचा समावेश आहे.






कोणत्या नेत्याला किती टक्के मतं 


1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी : 76 टक्के 


2. मेक्सिको, एंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर : 61 टक्के 


3. एंथनी अल्बनीज, ऑस्ट्रेलिया : 55 टक्के 


4. एलेन बेर्सेट, स्विट्जरलँड : 53 टक्के 


5. जॉर्जिया मेलोनी, इटली : 49 टक्के 


6. लूला डी सिल्वा, ब्राजील : 49 टक्के 


7. जो बायडेन, अमेरिका : 41 टक्के 


8. अलेक्जेंडर डी क्रू, बेल्जियम : 39 टक्के 


9. जस्टिन ट्रूडो, कनाडा : 39 टक्के  


10. पेड्रो सांचेज, स्पेन : 38 टक्के  


11. ओलाफ स्कोल्स, जर्मनी : 35 टक्के 


12. लिये वराडकर, आयरलँड : 35 टक्के  


13. ऋषि सुनक, ब्रिटन : 34 टक्के  


14. माटुस्ज मोराविकी, पोलँड : 33 टक्के  


15. उल्फ क्रिस्टर्सन, स्वीडन : 30 टक्के  


16. कार्ल नेहमर, ऑस्ट्रिया : 30 टक्के  


17. जापानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा : 29 टक्के  


18. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर : 28 टक्के  


19. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूत : 26 टक्के 


20. पंतप्रधान पीटर फियाला : 23 टक्के 


21. इमॅनुएल मॅक्रों, फ्रांस : 22 टक्के 


22. साउथ कोरियाचे राष्ट्रपति यूं सुक येओल : 19 टक्के 


कसं केलं जातं हे सर्वेक्षण? 


मॉर्निंग कन्सल्टनुसार, हा नेत्यांच्या लोकप्रियतेसंदर्भातील डेटा देशातील प्रौढांच्या सात दिवसांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. मॉर्निंग कन्सल्ट दररोज 20,000 पेक्षा जास्त जागतिक मुलाखती घेते. मुलाखतीत मिळालेल्या उत्तरांच्या आधारे, जागतिक नेत्यांबद्दल तयार केलेला डेटा तयार केला जातो. अमेरिकेत त्याचा नमुना आकार 45,000 हजार आहे. दुसरीकडे, इतर देशांचा नमुना आकार 500 ते 5000 च्या दरम्यान आहे.