नवी दिल्ली : कोरोना विरुद्ध लढण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचं प्रमाण नियंत्रणात आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात भारताने आता केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा नवा मंत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या समारोप अधिवेशनास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी भारताने जन आंदोलन उभं केलं, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले.
साल 2020पर्यंत प्रत्येक भारतीयाकडे हक्काचं घर
पंतप्रधान म्हणाले की, आमच्या सरकारने सर्व नागरिकांना घरे मिळवून देण्यासाठी 'हाऊसिंग फॉर ऑल स्कीम' सुरू केली आहे. यामुळे 2022 पर्यंत सर्व नागरिकांना स्वतःचे घर असेल याची खात्री आहे.
2025 पर्यंत टीबी नष्ट करण्याचे लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीबीचा देखील आपल्या भाषणात केला. ते म्हणाले की, 2025 पर्यंत टीबी पूर्णपणे नष्ट करण्याचे लक्ष्य आहे.
सबका साथ, सबका विकास हेच ध्येय
2030 पर्यंतचे निश्चित केलेले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी भारत पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. आम्ही विकसित देशांची मदत करत आहोत. आमचं उद्दिष्टच सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास आहे, असं मोदी म्हणाले.
भारताचे योगदान
भारताने नेहमीच संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कामांचा आणि ECOSOC चं सक्रियपणे समर्थन केलं आहे. ECOSOCचे पहिले अध्यक्ष हे एक भारतीय होते. ECOSOCच्या उद्दिष्टांना आकार देण्यात भारताचंही योगदान आहे, असं मोदी म्हणाले.
गरजूंना थेट आर्थिक मदत
भारत प्रत्येक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे. आम्ही महिलांना सशक्त बनवण्यासाठी सर्वांगीण दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर गरजू लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा केले आहेत.
अन्न सुरक्षा योजना
गरजूंना अन्न देण्यासाठी सरकारनं अन्न सुरक्षा योजना आणली. या अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून 830 मिलियन भारतीयांना लाभ मिळत आहे.