PM Kusum Solar Pump Yojana 2022 : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना चालवतात. यामधील प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana 2022) ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप लावण्यासाठी अनुदान मिळतं. देशातील वाढतं प्रदुर्षण आणि जागतिक तापमानवाढीचा धोका पाहाता सरकारने सौर ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. सरकार कुसुम योजनेअंतर्गंत सर्वसामान्यांना जोडत त्यांना कमाईचं साधन देण्याचा प्रयत्न करत आहे. पीएम कुसुम योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. 


सरकार किती अनुदान देतं?
पीएम कुसुम योजनेअंतर्गंत (PM Kusum Yojana 2022) सरकारकडून जवळपास 60 टक्के अनुदान दिले जाते. तर 30 टक्के लोन बँककडून मिळते. तर दहा टक्के शेतकर्यांना लावावे लागतात. त्यानंतर मोफत विजेचा लाभ घेता येऊ शकतो. कुसुम योजनेचा शेतकर्यांना मोठा फायदा होतो, कारण शेतकऱ्यांना विजेचासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. याचाच फायदा शेतीमध्ये दिसून येतो. 


कमाई कशी होणार?
जर एखाद्या शेतकऱ्यांकडे पाच ते सहा एकर जमीन असेल तर तो सोलार प्लांट करत कमीत कमी 15 ते 20 लाख युनिट (Electricity Unit) वीज निर्मिती करु शकतो. ही वीज तीन रुपये प्रति युनिटने विकली तरी जवळपास 60 लाख रुपयांची कमाई होऊ शकते. पण इतके मोठं सोलार प्लांट सुरु करण्यासाठी जवळपास 20 लाख रुपयांचा खर्च होतो. पण या योजनेमार्फत तुम्ही वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकता. त्याशिवाय शेतात तुमचा कायमस्वरुपी विजेचा प्रश्न सुटू शकतो. 


अर्ज कसा कराल?
 पीएम कुसुम योजनेसाठी (PM Kusum Yojana 2022) अर्ज करण्यासाठी तुम्हाला  https://mnre.gov.in/ या सरकारी संकेतस्थाळावर जावे लागेल. यामध्ये प्रॉपर्टी, आधार कार्ड आणि बँक डिटेल्सची माहिती भरावी लागेल. महत्वाचं म्हणजे, तुमची जमीन वीज उपकेंद्रांच्या पाच किलोमीटरच्या आतमध्ये हवी. तेव्हाच तुम्हाला पीएम कुसुम योजनेचा लाभ घेता येईल.