Ex President Facilities : देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) नव्या राष्ट्रपती म्हणून पदभार स्विकारणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. 


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज संसद भवनात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? देशाचा पहिला नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींना निवृत्तीनंतरही अनेक सुविधा दिल्या जातात. 


निवृत्तीनंतरही अनेक सोयी-सुविधा 


द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या नव्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांना राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) सोडावं लागणार आहे. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर रामनाथ कोविंद नवी दिल्लीतील 12 जनपथ येथील बंगल्यात शिफ्ट होतील. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचं या बंगल्यात अनेक दशकं वास्तव्य होतं. निवृत्त झाल्यानंतरही भारताचे राष्ट्रपती विलासी जीवन जगतात. तिन्ही लष्कराच्या सर्वोच्च कमांडर पदावरून निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना अनेक भत्ते आणि सुविधा मिळतात. माजी राष्ट्रपतींना 8 खोल्यांचा सरकारी बंगला देण्यात येतो. यासोबतच माजी राष्ट्रपतींना भरघोस पेन्शनही मिळते.


राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर कोणत्या सुविधा मिळतात?


राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर माजी राष्ट्रपतींना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळतं.
पत्नीला दरमहा सचिवीय सहाय्य म्हणून 30 हजार रुपये दिले जातात.
सचिवीय कर्मचारी आणि कार्यालयासाठी 60,000 रुपये दिले जातात. 
माजी राष्ट्रपतींना किमान 8 खोल्या असलेला बंगला दिला जातो. 
माजी राष्ट्रपतींना 2 लँडलाईन, एक मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शन दिलं जातं. 
माजी राष्ट्रपतींना मोफत वीज आणि पाण्याची सुविधा दिली जाते. 
माजी राष्ट्रपतींना काही वाहनं आणि चालकही दिले आहेत.
मोफत वैद्यकीय सुविधाही दिली जाते. 
माजी राष्ट्रपतींसाठी पाच वैयक्तिक कर्मचारीही दिले जातात. 
दिल्ली पोलिसांची (Delhi Police) सुरक्षा दिली जाते. 
माजी राष्ट्रपतींना (Former President) एका व्यक्तीसह प्रथम श्रेणीत मोफत ट्रेन आणि विमान प्रवासाची सुविधा दिली जाते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :