नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील (PM Kisan ) लाभ आता लाभार्थींच्या आधार लिंक बँक खात्यावर लाभ जमा होणार. आत्तापर्यंत लाभार्थीला त्याच्या बँक खात्यात किंवा आधार लिंक बँक खात्यात अनुदान जमा करण्याचा ऑप्शन होता. आता केवळ आधार लिंक बँक खात्यात अनुदान जमा केले जाईल. 


अद्याप 2.79 लाख लाभार्थ्यांचे आधार संलग्न नाही
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2009 मध्ये सुरू झाली. या योजनेमध्ये पात्र शेतकरी कुटुंबाला प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये प्रमाणे वार्षिक रुपये सहा हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून दिला जातो.
या योजनेत महाराष्ट्र राज्यात 1,09,33,298 शेतकरी खातेदार लाभार्थी असून त्यापैकी 1,06,53,329  खातेदारांची आधार कार्डनुसार माहिती प्रमाणित करण्यात आली आहे. अद्यापही सुमारे 2.79 लाख  लाभार्थ्यांचे आधार दिले नाही किंवा त्यांनी  दिलेला आधार क्रमांकामध्ये त्रुटी असल्याने ते प्रमाणित होऊ शकले नाहीत.


या योजनेअंतर्गत मार्च 2022 अखेर दोन हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत 10 हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र एप्रिल 2022 ते जुलै 2022 या कालावधीतील लाभाची रक्कम आणि या पुढील लाभाची प्रत्येक रक्कम ही लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील 1,06,53,329 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणित झाले असून त्यापैकी 88,74,872 लाभार्थ्यांचे  आधार त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत. मात्र उर्वरित 17,78,283  लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण जरी झाले असले तरी त्यांचे आधार त्यांनी बँक खात्याला लिंक केलेले नाही. सदर लाभार्थ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी तात्काळ आपल्या संबंधित बँकेत जाऊन आपले बँक खाते हे आधार  संलग्न लाभ मिळण्यासाठी अधिकृत करून घ्यावे. जेणेकरून त्यांना  मिळणार्‍या लाभाची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.


ज्या लाभार्थ्यांनी योजनेत नोंदणी करताना आधार क्रमांक दिला नाही किंवा त्यांच्या आधार क्रमांकामध्ये काही त्रुटी आहेत अशा लाभार्थींनी तात्काळ संबंधित तहसील कार्यालयाशी  संपर्क साधून आपल्या आधार तपशिलातील त्रुटी दूर करून घ्याव्यात आणि आपले आधार आपल्या बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे. जेणेकरून त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ त्यांच्या बँक खात्यावर जमा होईल.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


 


ABP Majha