PM Cares Fund : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी PM केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली आहे. हा निधी आरोग्य आणीबाणीसाठी मदत करणे, आरोग्य सेवा क्षेत्र अपग्रेड करणे किंवा कोणत्याही संबंधित संशोधनासाठी देण्यात येतो. मात्र, 2022-23 या आर्थिक वर्षात PM केअर्स फंडाच्या रकमेत मोठी घट झाली आहे. PM केअर्स फंडाकडे लोकांनी फिरवली पाठ फिरवल्याचे दिसत आहे. कारण, 2022-23 या आर्थिक वर्षात PM केअर्स फंडात 912 कोटी रुपये जमा झालेत. 2021-22 मध्ये 1938 कोटी रुपये जमा झाले होते. या वर्षाच्या तुलने 2022-23 मध्ये खूप कमी रक्कम जमा झाली आहे.
पीएम केअर्स फंडातील एकूण ऐच्छिक योगदान 2022-23 या आर्थिक वर्षात 912 कोटी रुपयांवर घसरले आहे. कोरोनाच्या संकटानंतर मार्च 2020 मध्ये या सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या स्थापनेपासूनची ही सर्वात कमी रक्कम आहे. त्यामुळं कोविडच्या कालावधीनंतर, लोक, संस्था आणि परदेशी देणगीदारांनी पीएम केअर फंडमध्ये आर्थिक योगदान कमी केले आहे.
2020-21 मध्ये पीएम केअर्स फंडात सर्वाधिक योगदान
पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत (पीएम केअर्स) फंडाच्या वेबसाइटवर प्रदान केलेल्या लेखापरीक्षण तपशीलांवरून असे दिसून आले आहे की 2020-21 मध्ये ऐच्छिक योगदानाने 7184 कोटी रुपयांचा उच्चांक गाठला होता. यानंतर 2021-22 मध्ये हे योगदान 1,938 कोटी रुपये झाले होते. 2022-23 मध्ये त्यात आणखी घट झाली आहे. या काळात पीएम केअर्स फंडात 912 कोटी रुपये जमा झाले आहेत.
पीएम केअर्स फंडातील परदेशी योगदानात मोठी घट
परदेशी योगदानामध्येही मोठी घट झाली आहे. 2020-21 मध्ये पीएम केअर्स फंडात परदेशी योगदान 495 कोटी रुपये होते. हे योगदान पुढील दोन वर्षांत अनुक्रमे 40 कोटी आणि 2.57 कोटी रुपयांवर घसरले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण खर्च अंदाजे 439 कोटी रुपये होता. त्यातील 346 कोटी रुपये 'पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन'ने वापरले होते. कोविड महामारीमध्ये ज्यांनी आपले पालकगमावले आहेत अशा मुलांना मदत करण्यासाठी हा सरकारी उपक्रम आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीवर अंदाजे 92 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 439 कोटी रुपये वितरित
जोपर्यंत पेमेंट आणि वितरणाचा संबंध आहे, पीएम केअर्स फंडाने 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 439 कोटी रुपये वितरित केले आहेत. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेनसाठी 346 कोटी रुपये, 99,986 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीसाठी 91.87 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.