PF BALANCE: जर तुम्हाला तुमच्या पीएफमधील बॅलन्स चेक करायचा आहे तर आता तुम्ही आपल्या मोबाईलवरुन तो चेक करु शकता. पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी चार पर्याय आहेत. चार पद्धती वापरुन आपण आपला पीएफमधील बॅलन्स काही क्षणात चेक करु शकतो. या चार पर्यायांचा वापर करुन आपण घरबसल्या आपल्या पीएफ खात्यातील रक्कम किती आहे हे चेक करु शकता.  (How much balance is in your PF account find out in minutes by these 4 ways)


पीएफ बॅलन्स चेक करण्याचे चार प्रकार


EPFO वेबसाईट वरुन
एसएमएसच्या माध्यमातून
मिस कॉल देऊन
UMANG App वरुन 


 EPFO वेबसाईवरुन असा कराल बँलन्स चेक 


EPFO च्या https://www.epfindia.gov.in या  वेबसाईटवर लॉग इन करा.  ई-पासबुक वर क्लिक करा
ई-पासबुक वर क्लिक केल्यावर https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login या नवीन पेजवर याल.
तिथं आपला  UAN नंबर आणि पासवर्ड तसेत कॅप्चा भरा
सर्व डिटेल्स भरल्यावर एक नवं पेज ओपन होईल. तिथं मेंबर आयडी सिलेक्ट करा. 
तिथं ई-पासबुकच्या माध्यमातून आपला ईपीएफ बॅलन्स पाहू शकाल 


SMS च्या माध्यमातून
आपण एसएमएसच्या माध्यमातून देखील पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करु शकतो. 
यासाठी आपला मोबाईल नंबर  EPFO सोबत रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे.  
रजिस्टर्ड  मोबाइल नंबरवरुन EPFOHO UAN लिहून 7738299899 वर एसएमएस करावं लागेल.
आपल्याला बॅलन्स संबंधी डिटेल्स हिंदीसह अन्य भाषांमध्ये मिळतील. आपल्याला ज्या भाषेत माहिती हवी आहे त्या भाषेचा कोड द्यावा लागेल.  


मिस कॉलच्या माध्यमातून


पीएफ अकाऊंटशी जो नंबर लिंक केला आहे त्या रजिस्टर नंबर वरुन 011-22901406 या नंबरवर मिस-कॉल द्या
मिस-कॉल दिल्यानंतर लगेच आपल्य़ा रजिस्टर नंबरवर मॅसेज येईल यात  PF Balance ची माहिती मिळेल. 


 UMANG App च्या माध्यमातून


आपल्या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवरुन Umang App डाऊनलोड करा
आपला फोन नंबर रजिस्टर करा आणि अॅपमध्ये लॉगिन करा 
टॉप वर डाव्या बाजूला दिलेल्या मेन्यू ऑप्शनमध्ये जाऊन ‘Service Directory’ मध्ये जा
तिथं EPFO हा पर्याय दिला असेल, त्यावर क्लिक करा 
तिथं View Passbook मध्ये गेल्यानंतर आपला UAN नंबर आणि OTP टाकून बॅलन्स पाहता येईल.