ग्राहकांना तातडीने दिलासा देण्यासाठीच्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा होईल. नवी दिल्लीत आज सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या आसपास ही बैठक होणार आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेतं आणि ग्राहकांना आजच दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पेट्रोल, डिझेल महाराष्ट्रात सर्वाधिक महाग
मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झालं आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोल आज 76.87 रुपये प्रति लिटर आहे, जो दर सर्वात महाग आहे. यापूर्वी सप्टेंबर 2013 मध्ये पेट्रोल 76.06 रुपये प्रति लिटर होतं.
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे. सोलापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 85.40 रुपये आहे. तर औरंगाबादमध्येही 85.36 रुपये प्रति लिटर दर आहे.