मुंबई : पेट्रोल पंप व्यवसायावरील जाचक अटी, ऑईल कंपन्यांची आणि शासनाची मनमानी यामुळे युनायटेड पेट्रोलियम फ्रंटने 13 तारखेला 1 दिवसीय संप पुकारला आहे. यामध्ये 54 हजार डिलर सहभागी होणार आहेत. 13 ऑक्टोबर रोजी देशातील 54 हजार पेट्रोल पंपांवर इंधन खरेदी-विक्री बंद राहिल.


रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचं नुकसान होत आहे. तसंच सरकार पेट्रोल डीलर्सच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. येत्या काही दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 27 ऑक्टोबरपासून बेमुदत संप करणार असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.

डीलर्सच्या मागण्या काय?

  • 4 नोव्हेंबर 2016 चा ऑईल कंपनी बरोबर झालेला पण न पाळलेला करार

  • मार्केटिंग डिसीप्लीन गाईडलाईनमध्ये लावलेल्या प्रमाणाबाहेरील अन्यायकारक पेनल्टीज

  • कबुल केलेले पण न दिलेले डीलर मार्जिन

  • रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचे होत असलेले नुकसान

  • राज्यानुसार बदलणारे दर जे की GST मध्ये इंधन आणल्यास स्वस्त आणि समान होतील