नवी दिल्ली: पेट्रोल पुन्हा एकदा महागलं असून डिझेलच्या किंमतीत मात्र किंचितशी घट झाली आहे. पेट्रोल प्रति लीटर 58 पैशांनी महागलं असून डिझेल प्रति लीटर 31 पैशांनी स्वस्त झालं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार पेट्रोल-डिझेलच्या दर निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यान पंधरा दिवसांपूर्वीच म्हणजेच 31 ऑगस्ट 2016ला पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. पेट्रोल तब्बल 3 रुपये 38 पैशांनी महागलं होतं. तर डिझेलच्या 2 रुपये 67 पैशांनी महाग झालं होतं.
सध्या मुंबईत पेट्रोलचा दर 68.40 आहे. यामध्ये आता आणी 0.58 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आता जवळजवळ 70 रुपयांच्या आसपास पोचलं आहे. तर डिझेल मात्र 31 पैशांनी स्वस्त झालं आहे.