शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांची बस पेटली, चिमुकल्याचा मृत्यू, 6 जखमी
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा | 16 Sep 2016 08:57 AM (IST)
हैदराबाद: शिर्डीहून दर्शन करून हैदराबादला परत निघालेल्या ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका बाळाचा होरपळून मृत्यू झाला. तर सहा भाविक जखमी झाले आहेत. जखमीमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हुमणाबादजवळ आज पहाटे ही धक्कादायक घटना घडली. आग इतकी भीषण होती की पूर्ण बसचा अक्षरश: सांगाडा दिसत आहे. या बसमध्ये एकूण 44 प्रवासी होते. सर्वजण हैदराबादमधील असल्याचं सांगण्यात येत आहे.