नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे त्रासलेल्या सामान्यांसाठी बुधवारी एक दिलसादायक बातमी आली होती. परंतु काही वेळातच ती चुकीची असल्याचं सिद्ध झाली. सुरुवातीला पेट्रोलच्या दरात 60 पैशांची कपात झाल्याची बातमी होती. पण ही कपात 60 नाही तर एक पैशांची असल्याचं स्पष्टीकरण इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) च्या वेबसाइट देण्यात आलं. त्यामुळे पेट्रोलचे दर केवळ एकाच पैशानेच घटल्याचं स्पष्ट झालं आहे.

इंडियन ऑईल  कॉर्पोरेशनची तांत्रिक चूक

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले. त्यात पेट्रोलमध्ये 60 पैसे आणि डिझेलमध्ये 57 पैशांची कपात झाल्याचा उल्लेख होता. परंतु एक तासाभरातच कंपन्यांनी तांत्रिक चूक झाल्याचं सांगत दरांमध्ये बदल केले. म्हणजेच ग्राहकांना केवळ एक पैशाचाच दिलासा मिळाल्याचं समोर आलं आहे.


स्पष्टीकरण काय दिलं?

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, “पेट्रोल आणि डिझेलचे दर पोस्ट करताना एक तांत्रिक चूक झाली होती. जी आता दुरुस्त करण्यात आली आहे. आज तेलाच्या दरात विशेष बदल झालेला नाही.”

काँग्रेस अध्यक्षांचा पंतप्रधानांवर निशाणा

पेट्रोलच्या दरांचं वास्तव समोर आल्यावर राजकारणही तापलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करुन पंतप्रधानांवर निशाणा साधला. “प्रिय पंतप्रधानजी, तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. तेही फक्त एक पैशाने? जर प्रँकची तुमची ही कल्पना असेल, तर हा बालिशपणा आहे. मी तुम्हाला जे इंधन दर घटवण्याचं चॅलेंज दिलं होतं, त्याला हा प्रतिसाद केवळ गरीबी आहे,” असं ट्वीट त्यांनी केलं.


पेट्रोल 3.8 तर डिजेल 3.37 रुपयांनी महागलं!

सलग 16 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या 16 दिवसात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.8 रुपये तर डिझेलच्या दरात 3.37 रुपयांनी किंमती वाढतच आहेत. पेट्रोल-डिझेल नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहेत. पण वाढत्या किंमतीमुळे केंद्र सरकारला विरोधाचा सामना करावा लागत आहे.

संबंधित बातम्या

रोज पै-पै ने वाढणाऱ्या पेट्रोलची रुपयातील वाढ किती?

इंधनदरवाढ सलग 15 व्या दिवशी सुरुच, पेट्रोल 12 पैशांनी महाग  

इंधन दरवाढीवर लवकरच दीर्घकालीन उपाययोजना : अमित शाह  

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राच्या हालचाली  

इंधन दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत  

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार : केंद्र सरकार  

देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावती, औरंगाबादमध्ये! 

पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?  

 ... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल   

पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!